E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
न्यायाधीश लाहोटी यांची बदली
Samruddhi Dhayagude
07 Apr 2025
मालेगाव बॉम्बस्फोट खटला
मुंबई : मालेगावमध्ये २००८ मध्ये बॉम्बस्फोट झाला होता. या बॉम्बस्फोटाचा खटला पाहणारे विशेष एनआयए न्यायालयाचे न्यायाधीश ए.के. लाहोटी यांची बदली करण्यात आली आहे. लाहोटी यांची बदली नाशिक जिल्हा न्यायालय येथे करण्यात आली आहे.नियोजित बदलीला मुदतवाढ देण्याच्या मागणीसाठी प्रकरणातील पीडितांनी उच्च न्यायालयाला पत्रव्यवहार केला होता.
खटल्याचे कामकाज अंतिम टप्प्यात आहे. तसेच, अतिरिक्त न्यायाधीश लाहोटी यांनी खटल्याचे जवळपास संपूर्ण कामकाज पाहिले आहे आणि युक्तिवाद ऐकला आहे. खटल्यात आतापर्यंत नोंदवण्यात आलेल्या साक्षीपुराव्यांवर सरकारी आणि बचाव पक्षाचा सध्या अंतिम युक्तिवाद सुरू आहे. त्यामुळे, खटल्याच्या अशा टप्प्यात त्याचे कामकाज पाहणार्या न्यायाधीश लाहोटी यांची तूर्त बदली केली जाऊ नये, त्यांच्या नियोजित बदलीला मुदतवाढ देण्यात यावी, असे पीडिताने उच्च न्यायालयाला लिहिलेल्या पत्रात म्हटले होते.
दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरलने लाहोटी आणि इतर न्यायाधीशांच्या बदलीचा आदेश जारी केला आहे. हा आदेश उन्हाळी सुट्टीनंतर ९ जूनपासून लागू होईल, असेही यात नमूद केले आहे.दरम्यान, शनिवारी पार पडलेल्या सुनावणीत न्यायाधीश लाहोटी यांनी फिर्यादी आणि बचाव पक्षाला १५ एप्रिलपर्यंत उर्वरित युक्तिवाद पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते.
२९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगाव येथील मशिदीजवळ एका स्फोटात ६ जण ठार आणि १०० हून अधिक जखमी झाले होते. या प्रकरणात बेकायदा कारवाया प्रतिबंध कायदा (यूएपीए) आणि भारतीय दंड संहितेंतर्गत (आयपीसी) लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित आणि माजी भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांसह मेजर रमेश उपाध्याय (निवृत्त), अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी यांच्यावर खटला चालविण्यात येत आहे. त्यातील समीर कुलकणींवरील कारवाईला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
Related
Articles
श्रेयस अय्यरला आयसीसीकडून सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार
16 Apr 2025
वाल्मीकच्या ‘एन्काउंटर’ची होती ऑफर
15 Apr 2025
विद्यार्थ्यांसह वकिलांना मसुदा लेखनाचे धडे
17 Apr 2025
वणव्यात आंब्याच्या बागेचे नुकसान
12 Apr 2025
‘वक्फ’ कायद्याविरोधात आणखी एक अर्ज
15 Apr 2025
दहशतवादी प्रकरणात प्रदीर्घ तुरुंगवास योग्य; जामीन नाही
16 Apr 2025
श्रेयस अय्यरला आयसीसीकडून सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार
16 Apr 2025
वाल्मीकच्या ‘एन्काउंटर’ची होती ऑफर
15 Apr 2025
विद्यार्थ्यांसह वकिलांना मसुदा लेखनाचे धडे
17 Apr 2025
वणव्यात आंब्याच्या बागेचे नुकसान
12 Apr 2025
‘वक्फ’ कायद्याविरोधात आणखी एक अर्ज
15 Apr 2025
दहशतवादी प्रकरणात प्रदीर्घ तुरुंगवास योग्य; जामीन नाही
16 Apr 2025
श्रेयस अय्यरला आयसीसीकडून सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार
16 Apr 2025
वाल्मीकच्या ‘एन्काउंटर’ची होती ऑफर
15 Apr 2025
विद्यार्थ्यांसह वकिलांना मसुदा लेखनाचे धडे
17 Apr 2025
वणव्यात आंब्याच्या बागेचे नुकसान
12 Apr 2025
‘वक्फ’ कायद्याविरोधात आणखी एक अर्ज
15 Apr 2025
दहशतवादी प्रकरणात प्रदीर्घ तुरुंगवास योग्य; जामीन नाही
16 Apr 2025
श्रेयस अय्यरला आयसीसीकडून सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार
16 Apr 2025
वाल्मीकच्या ‘एन्काउंटर’ची होती ऑफर
15 Apr 2025
विद्यार्थ्यांसह वकिलांना मसुदा लेखनाचे धडे
17 Apr 2025
वणव्यात आंब्याच्या बागेचे नुकसान
12 Apr 2025
‘वक्फ’ कायद्याविरोधात आणखी एक अर्ज
15 Apr 2025
दहशतवादी प्रकरणात प्रदीर्घ तुरुंगवास योग्य; जामीन नाही
16 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मंथनातून नवी दिशा (अग्रलेख)
2
बिहारमधील नवी ‘घराणेशाही’
3
विचारांची पुंजी जपायला हवी
4
शुल्कवाढीचा भूकंप
5
आयात शुल्कवाढीचा भडका कायम
6
जेजुरी गडाला राज्यस्तरीय स्मारकाचा दर्जा घोषित